जबरदस्ती ने नाही स्वाभिमानाने भवानी तलवार शिवाजी महाराजांना मिळाली होती
इतिहास महाराष्ट्राचा असो किव्हा भारताचा…. त्या इतिहासाला चित्रपट आणि कादंबरीच्या नजरेतून बघणे पूर्णपणे चुकीचे आहे…एखाद्या सिनेमाच्या सुरुवातीला काल्पनिकतेची सूचना दाखवण्यात येते, कथानक भले ही खऱ्या प्रसंगावर आधारित असेल, तरीही त्याला काल्पनिकता किव्हा इमॅजिनेशन ची जोड द्यावीच लागते…
पण तुम्ही विचार करत असणार कि हे आम्ही का सांगत आहोत ? कारण आम्ही बघितलंय कि काही लोक सिनेमा आणि कादंबरीला ऐतिहासिक नजरेतून बघतात आणि त्यालाच खरा इतिहास समझतात… माघे आम्ही कोणतातरी सिनेमा बघितला त्यात असे दाखवण्यात आले कि. महाराजांना भवानी तलवार सावंतांशी चकमक करून भेटते….. सिनेमाला एंटरटेनमेंट चा लुक मिळण्यासाठी अस्यप्रकाराचा काल्पनिकतेचा आधार घ्यावा लागतो, पण ह्या दृश्यांमधून लोकांना काय शिकायला मिळते ? कि महाराजांना भवानी तलवार अश्या चकमकीतून भेटली… बरोबर ना ?
आजचा विडिओ ह्याच मुद्यावर आहे, कि महाराजांना भवानी तलवार कशी मिळाली असेल…
तर ह्या विषयावर आपण चिटणीस आणि सभासद बखरला बाजूला ठेवणार आहोत. आणि कृष्णराव अर्जुन केळुस्कर ह्यांनी लिहिलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ह्या पुस्तकाचा आधार घेणार आहोत…. असे बोलण्यात येते कि इंग्रजांच्या काळात केळुस्कर पहिले व्यक्ती होते ज्यांनी महाराजांचे सविस्तर चरित्र लिहिले होते… पण त्यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये कोणत्या कागदपत्रांचा आधार घेतला असावा, हे समझत नाही… संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती ही ह्या पुस्तकात सापडते… पण या प्रश्नाला वगळता, या पुस्तकामधील काही गोष्टी फार व्यवस्थित दिसतात….
तर आपण आपल्या मुद्यावर येऊ, महाराजांच्या हाती भवानी तलवार नव्हती, तेव्हाही ते महाराजच होते. अर्थातच तलवार कितीही मजबूत असली तरी, चालवण्याच्या मनगटात दम असावा… छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पूर्ण आयुष्य घोड्यावर बसून घालवले, त्यांच्या पराक्रमाचा विचार करून रक्त सळसळत वाहू लागते…. असे आपके शककर्ते महाराज युद्धात मिळवलेल्या कोणत्या वस्तूचा वापर करतील, ही पचण्यासारखी गोष्ट बिलकुल नाही….
काही वर्षांपूर्वी आम्ही एका इतिहासकारांचे भाषण ऐकत होतो, त्यांचे नाव तर आठवत नाही, पण त्याच भाषणात ते बोलत होते कि महाराजांचे मावळे युद्धानंतर क्षत्रू सैन्याचे शस्त्र जमा करायचे आणि त्यांना विळघळून नवे हत्यार बनवायचे…
महाराजांनी कमी संसाधनाच्या बळावर स्वराज्य निर्माण केले, असे आपले महाराज मिळवलेली तलवार वापरणार नाही… हे इकडेच सिद्ध होते….
कृष्णराव केळुस्कर बोलतात कि महाराजांचे पराक्रम दिवसानुदिवस वाढत होते, शाहजी राजेंच्या जाहागीरातून सुरुवात करून ते ठाणे, भिवंडी, कल्याण पर्यंत पोहोचले… जवळ जवळ अर्धे कोकण आदिलशाह कडे होते तर अर्धे मुघलांकडे…… समुद्राजवळ चा थोडा थोडा भाग सिद्द्याच्या देखरेखीत होता…. त्यामध्येच इंग्रज आणि पोर्तुगीज आपली मनमानी करायचे….
अशा परिस्थितीत छोटे छोटे हिंदू वतनदार आपआपली जमीन घेऊन राज करत होते…. दक्षिण कोकणात सावंतांचा दबदबा असायचा…. राज्य हिंदूंचे असायचे पण राज सिद्दी, इंग्रज, मुघल, आदिलशाह करायचे….. अशा परिस्थितीत सूर्य समान तारा दिसला… ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम……. एक असा व्यक्ती, ज्याने आपले विसाव्वे वयपण बघितले नव्हते….. जसजसे दिवस सरकत होते तसतसे शिवरायांचा पराक्रम कोकणात पसरत होता…. परदेशी लोकांच्या खाली राहण्याची सवय कोकणप्रांतात राहणाऱ्या लोकांना झालीच होती, त्यातच एक सूर्यसमान व्यक्ती सामान्य जनतेसाठी लढत आहे, हे बघूनच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते…..
छोटे छोटे वतनदार छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून आमंत्रण करू लागले. सिद्द्यांच्या राजवटीत राहण्यापेक्षा स्वतःच्या माणसाच्या छत्रात राहणे- त्यांना सवलतीचे वाटले… त्यातच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावल्यासकट कोंकण प्रांतात वावरू लागले…. तिथले छोटे मोठे किल्ले स्वराज्यात जोडत असतांना एका सावंतांचा निरोप महाराजांना आला… महाराज हरिहरेश्वर मंदिरात नुकतेच भेट देऊन निघत होते, त्यातच त्यांना असा निरोप भेटला कि गोवळकर सावंतांच्या घरी एक ‘धोप’ तलवार आहे. महाराजांनी ती तलवार विकत घ्यावी- असे मावळे बोलू लागले… हा प्रकार बघून महाराज बोलले कि लोकांच्या वस्तूंवर नजर ठेवणे हे एका मर्द पुरुषाला शोभत नाही.
त्यातच सावंतांच्या वाड्यात लोकं बोलू लागली कि, सावंतांनी ती तलवार महाराजांना देऊन मित्रता करून घ्यावी… म्हणजे सावंतांच्या राज्याला महाराजांचे संरक्षण मिळेल. त्यामुळे सावंत स्वतः जाऊन महाराजांना भेटले आणि त्यांनी ती तलवार महाराजांना भेट म्हणून दिली…. त्याच्या बदल्यात महाराजांनी सावंतांना स्वराज्यात आणले… तसेच पोशाख आणि ३०० होन देऊन सत्कार सुद्धा केला…..