शहाजी राजे छत्रपती किव्हा राजे झाले का नाही ?

स्वराज्य संयोजक श्री शाहजी राजे भोसले, ह्यांची महिमा गातांना एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे शिवाजी महाराजांना स्वराज्याची बांधणी केली, पण त्या स्वराज्याची पायाभरणी स्वतः शाहजी राजेंनी केली. त्या महत्वपूर्ण योगदानाची पावती शाहजी राजांना भेटली का ? अर्थातच नाही…. आमच्या चॅनेल वर शाहजी राजेंनी जी कामगिरी केली, त्यावर बरेच विडिओ भेटतील. शिवचरित्राचा सविस्तर अभ्यास करण्याच्या अगोदर शाहजी राजेंना पूर्णतः जाणून घेणे गरजेचे आहे… नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची अनामिक, स्वागत आहे तुमचे तुमच्या चॅनेल मध्ये ज्याला म्हणतात ‘मराठा एम्पायर द हिस्टरी टीव्ही’.

आजचा मुद्दा आहे, शाहजी राजे आदिलशाहीत का गेले ? या प्रश्नाचा उत्तर त्या काळातील गोष्टींमध्ये लपलेले आहे. पोर्तुगीस ला शाहजी राजेंनी पत्र लिहून, जाहीर करून टाकले होते कि बालवयात असलेल्या निजामशाही वंशजाचा सांभाळत, ते स्वतंत्रपणे राज्य करीत आहेत.

ह्या परिस्थिती मध्ये त्यांना आदिलशाह आणि मुघलांकडून मोठा धोका होता… दोन्ही बाजूने त्यांच्या वर आक्रमण होत होते, तरीही माहुलीच्या किल्यात छोट्या निजामशाहला ठेऊन ते पराक्रम गाजवत होते. शहाजी राजांच्या मनात एकच स्वप्न होते- मराठ्यांचे स्वतंत्र राज्य!

आता निजामशहाच्या राज्यावर तीन लोकांची नजर होती, एक शाहजी राजे, दुसरे आदिलशाही आणि तिसरे मुघल….
आपापसात युद्ध करण्या पेक्षा हाथ मिळवून राज्याची वाटणी करून घ्यायची- हा मार्ग मुघल बादशाह शाहजहान आणि आदिलशाह ने निवडला…. दोघे एक झाले आणि त्यांनी निजामशाहीच्या मुलुखाची विभागणी केली…. मुघलांकडून खान जमान आणि आदिलशहा कडून रणदुल्ला खान.. ह्या मोठ्या सरदारांची निवड झाली. या दोघे एकट्या शाहजी राज्यांवर चालून आले… पण तरीही शाहजी राजे यांनी त्यांचा सामना केला आणि माहुली किल्यासकट निजामशाहच्या वंशजाला सुरक्षित ठेवले.

कदाचित ही लढाई बरेच महिने चालू होती, कारण शाहजी राजे कोणत्याही परिस्थितीत हार मानत नव्हते…. मराठांच्या स्वतंत्र राज्यासाठी शहाजीराजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढा देत होते.

डक्कन आणि सह्याद्रीत मालोजी राजे आणि लखुजी राजे नंतर तिसरा पराक्रमी व्यक्ती फक्त शाहजी राजे भोसले आहे- ही गोष्ट आदिलशाहला समझली, आणि त्यांने त्याचा वजीर पाठवून ‘शांततेची’ ची मागणी केली.
इकडे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे शाहजी राजेंनी युद्ध थांबवून करार करण्यात होकार तर दिला, पण त्या मागे त्यांची एकच उच्च होती… ती म्हणजे मराठ्यांची जागीर मराठ्यांकडेच असावी….

अदिलशाहला शाहजीराज्यांसारखा मोठा योद्धा गमवायचा नव्हता, म्हणून त्याने ही होकार दिला.

तर अश्या प्रकारे शाहजी राज्यांनी, 1639 च्या सुमारास आदिलशाह बरोबर करार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग मोकळा केला… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *