मराठी भाषेचा उगम

मराठी साहित्याला उपनाम लाभले ते पु.ल.देशपांडे आणि कुसुमाग्रज याच्यासारख्या लेखक मंडळी मुळे. हा इतिहास आपण लहानपणापासून शिकत किंवा ऐकत आलो आहोत. पण मराठी साहित्याची सुरुवात कोणी केली असावी? हा प्रश्न कधी आपल्याला पडला का? पडला असला तरी उत्तर मात्र कधी मिळाल नसेल. मराठ्यांच्या इतिहासाची माहिती असणाऱ्या लोकांना सुद्धा या प्रश्नाच उत्तर मिळाला नसेल. आपण बोलायला म्हणून संत ज्ञानेश्वरांच नाव पुढे ढकलून स्वतःच समाधान करून घेतो. पण मराठी साहित्याची सुरुवात खरच संत ज्ञानेश्वरांनी केली होती का ? आज आपण संत ज्ञानेश्व्रांबरोबर मुकुंदराज आणि म्हईभट यांच्या व्याक्तीचारीत्रांवर चर्चा करून मराठी साहित्याचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करूयात. मराठी साहित्यावर चर्चा करण्या अगोदर महाराष्ट्राचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून घेऊयात.
कोंकणातील १२००० वर्षांपूर्वीचे पेट्रोग्लीफ्स पण प्राचीन अवशेषांचा भाग आहे.
मराठी, मराठा किंवा महाराष्ट्र, हे नाव कुठून आले ? तामिळनाडू चा रहिवासी तमिळ, गुजरात चा रहिवासी गुजराथी…मग महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकाना ‘मराठी’ हे विशिष्ठ नाव कसे काय मिळाले? कारण महाराष्ट्राला जेवढा मोठा आणि प्राचीन इतिहास लाभला, तेवढा भारताच्या इतर कोणत्याही राज्याला लाभला नाही. नर्मदा नदीच्या अवतीभवती वावरणाऱ्या डयनोसौर च्या अवशेषांना नर्मदेसौरस किंवा राजस-सौरस नाव देण्यात आल होत. मध्यप्रदेशातल्या भीमबेटका येथिल ४ लाख वर्षापूर्वीचे आदी मानव्कालीन गुहा आणि कोरीवकाम बघून भारताच्या प्राचीनतेचा दाखला मिळतो. कोंकणातील १२००० वर्षांपूर्वीचे पेट्रोग्लीफ्स पण प्राचीन अवशेषांचा भाग आहे. राजस्थान मध्ये प्राचीनकाळी सरस्वती नदी वाहत होती, ह्याचे पुरावे पण मिळतात. पण या सगळ्या गोष्टींचा मानवी संस्कृतीशी संबंध येत नाही. दक्षिण भारतातील प्राचीन संस्कृती वेळोवेळी बदलत गेली, सम्राट अशोक च पाटलीपुत्र आज पटना झाला. भारतच्या प्रत्येक राज्याचा इतिहास वेळेनुसार बदलत गेला. पण महाराष्ट्र हे एकमात्र राज्य आहे ज्याची प्राचीनता सहाव्या शतकात आलेल्या एका चीनी प्रवाश्यांने लिहून ठेवली आहे. सहाव्या शतकात ह्युएन्त्सन्ग नावाचा प्रवासी महाराष्ट्र आला होता, त्याने महाराष्ट्राची भौगोलिक व्यापकता त्याच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवली आहे. मध्यप्रदेश मधील सागर जिल्यात सापडलेल्या तिसर्या शतकातील शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वतः ‘महाराष्ट्र’ असे म्हटले आहे. नवव्या शतकात राजशेखर नावाच्या नाटककाराने ‘बालरामायण’ ग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केला आहे.
सातवाहन काळी पुरुषांना ‘मरहट्ट’ आणि स्त्री ला ‘मरहट्टी’ बोलत असत.
या प्राचीन महाराष्ट्रातील रहिवाश्यांचा ‘मरहट्ट’ असा उल्लेख होत असे. याचे अनेक दाखले मिळतात. आठव्या शतकात कौहल नावाच्या कवीने लीलावई नावाचे काव्य लिहिले होते, त्यात त्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे वर्णन मरहटट म्हणून केले आहे. बुद्ध धर्मातील महावंश पुराणात देखील मरहटटंचा उल्लेख सापडतो. दुसर्या शतकात खोदलेल्या कान्हेरी, कार्ला, नाणेघात, भाजे सारख्या लेण्यात मरहटटाचे वर्णन सापडतात. विजापूर येथील ऐहोळे गावात सापडलेल्या सहाव्या शतकातील शिलालेखात असे लिहिले आहे कि नव्याण्णव हजार गावे मिळून एक महाराष्ट्र बनतो. असे तीन महाराष्ट्राकांचा अधिपती ‘पुलकेशी’ आहे. या शिलालेखात ज्या पुलाकेशीचा उल्लेख केला आहे तो चालुक्य साम्राज्याचा मोठा राजा होता. भाषेचा अंत असतो पण बोलीभाषा भाषा बदलत जाते. महाराष्ट्रातील राष्ट्र या शब्दाचे पहिले रूप हटट आहे. सातवाहन काळी पुरुषांना ‘मरहट्ट’ आणि स्त्री ला ‘मरहट्टी’ बोलत असत. वर्षानुवर्षे शब्दांना बोलण्याचा प्रकार बदलत गेला आणि महाराष्ट्र ह्या शब्दाचा उद्य झाला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा बदल फक्त आपल्या महाराष्ट्र ह्या एकमात्र राज्यासाठी झाला, आणि मानूनच महाराष्ट्र हे भारतातले सगळ्यात प्राचीन राज्य आहे. सातव्या शतका मध्ये उद्योदन सुरी नावाच्या जैन लेखकाने कुवलयामाला नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचा अनेक शब्दात उल्लेख केला आहे. ते बघून अतिशय अभिमान वाटतो कि, महाराष्ट्राचे पूर्वज अभिमानी आणि कतृत्ववान होते. उद्योदन सुरी च्या अनुसार मराठा म्हणजे ‘घटमुट, काळासावळ, सहनशील, अभिमानी व कलहशील, दिनल्ले, गहिल्ले असे बोलणारा मरहटटा’.
अल्लाउद्दिन खिलजी च्या रुपात पहिले म्लेंच्छ आक्रमण.
प्राचीन महाराष्ट्रात पहिले साम्राज्य निर्माण झाले ते सातवाहनांचे. त्या अगोदर या भूमीवर महाराष्ट्र बाहेरील साम्राज्याचा अधिकार होता. उत्तर भारतातीला मौर्य आणि शुंग साम्राज्याचे पतन झाले आणि त्या क्षेत्रातून लढाऊ प्रजाती महाराष्ट्रात येऊ लागली. त्या मधून वेगवेगळ्या प्रकारचे घराणे निर्माण होत गेले आणि तिथूनच सातवाहन साम्राज्याचा उद्या झाला. २००० वर्ष जुन्या सातवाहन साम्राज्यापासून ते अगदी १३ व्या शतकातील यादव साम्राज्यापर्यंत महाराष्ट्राचा खूप विकास होत गेला आणि याच विकासाचा फायदा तुर्कमेनिस्तान आणि आफ्रिकेतून आलेल्या परप्रांतीयांना झाला. अल्लाउद्दिन खिलजी च्या रुपात पहिले म्लेंच्छ आक्रमण यादव साम्राज्यातील वीर पुरुषांनी सहन केले आणि याच यादव घराण्यातून जाधव घराण्याचा उद्य ‘येउल’ इथे झाला. जाधव घराण्याची कन्या राजमाता जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि प्राचीन महाराष्ट्राला लागलेली कीड काढत आधुनिक महाराष्ट्र घडविले.
‘विवेकसिंधू’ हा पहिला मराठी काव्यग्रंथ.
हा झाला प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, आता आपण मुख्य विषयावर येऊ. मित्रानो तुम्हाला माहिती असेल कि साहित्य आणि संस्कृती एकमेकांशी जोडलेलं आहेत. ज्या ठिकाणी संस्कृती येते तिथे लोककलेबरोबर साहित्याचा उदय होतो. तर मग महाराष्ट्राचे अस्तित्व दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे, मग महाराष्ट्राची साहित्यिक परंपरा संत ज्ञानेश्वरांपासून कशी बर् सुरु झाली ? संत ज्ञानेश्वारांपुर्वी महानुभाव पंथातील चक्रधर स्वामिनी आणि म्हाइभटानी मराठी साहित्याला चांगलाच आधार दिला. म्हाइभट आणि संत ज्ञानेश्वरांच्या आधी ११व्या शतकात ‘मुकुंदराज’ नावाचे विचारवंत होते त्यांनी पूर्णतः महाराष्ट्राला साहित्यिक परंपरेशी ओळख करून दिली. मुकुंदराज ह्यांनी ‘विवेकसिंधू’ हा पहिला काव्यग्रंथ मराठीत लिहिला. परंतु १२ व्या शतकात मराठी भाषेत क्रांतीकारी बदल आणला तो संत ज्ञानेश्वरांनी. पण इतिहासकारांना हा प्रश्न पडतो कि जर महाराष्ट्राची संस्कृती २००० वर्षांपूर्वीची आहे तर साहित्याचा जन्म ११व्या शतकात कसा झाला ? कदाचित मुकुंदराज यांच्या अगोदर देखील कुणीतरी मराठी मध्ये काव्य रचना किंवा ग्रंथ लिहिले असावेत, जे परकीय आक्रमानांमुळे नष्ट झाले असावेत. या विषय वर तुम्हाला काय वाटतय हे तुम्ही कमेट सेक्शन मध्ये कळवा, धन्यवाद.