जैन युनिव्हर्सिटीत जातीवाद करणाऱ्या शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी पूर्ण नाटक बसवले. नांदेड मध्ये गुन्हा दाखल
असे बोलण्यात येते की माणूस शिक्षित होतो तेव्हा त्याचा धर्म आणि जाती कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण हे वाक्य कितपत खरे आहे ? कधी कधी माणूस अपेक्षेपेक्षा जास्त शिकून घेतो आणि ज्यांनी शिकवले त्यांनाच शिकवायला लागतो. जात धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच असावा, कारण त्या व्यक्तीने भारत देशासाठी असे कार्य करून ठेवले आहेत जे पारंपरिक व रूढीवादी व्यक्ती असंख्य जन्म घेऊनसुद्धा करू शकत नाही. आम्ही हे का बोलतोय ? कारण बैंगलोर मधील एक खासगी विश्वविद्यालयात झालेल्या वार्षिक समारोहात विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर एक नाट्य (skit) बसवत दलितांचा अपमान केला आहे. या नाटकात बाबासाहेबांना बिअर आंबेडकर (Beer Ambedkar) बोलत हिणवण्यात आले आणि ‘touch me, touch me’ असे बोलत अस्पृश्यतावर हास्यापद टीका करण्यात आली आहे. तो अपमानास्पद स्किट काय होता हे या विडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता-
आता तुम्ही विचारणार की ही कोणती युनिव्हर्सिटी आहे ? कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण जैन युनिव्हर्सिटी भारताची सगळ्यात प्रतिष्ठित आणि महाग शैक्षणिक संस्था आहे. या युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये असायला पाहिजे. या जैन युनिव्हर्सिटी (Jain university) चा हेड ऑफिस बैंगलोर मध्ये असून, खेळ, राजकारण आणि सिनेमाजगातील बरेच मंडळी ह्या संस्थेतून शिकून आले आहेत. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि के एल राहुल (KL Rahul) सारखे खेळाडू याच जैन युनिव्हर्सिटी मधून आले आहेत.

जैन युनिव्हर्सिटीमधील काही लोकांच्या मते या नाटकाला बसवणारे शिक्षक ब्राम्हण समाजातले असून इतर अब्राह्मण लोकांना हीन दर्जाची वागणूक देण्यासाठी ते पूर्ण कॉलेज मध्ये प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई आणि नांदेड मध्ये जैन युनिव्हर्सिटीच्या हेड च्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.