मराठी पाऊल पडते पुढे. मराठी माणूस बायकोला मारण्यात तिसऱ्या क्रमांकावर. डोमेस्टिक व्हायलेन्स मध्ये राजस्थानच्या पुढे महाराष्ट्र.

जगात काही देशांना वगळून विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, या मध्ये भारताने देखील कमालीची कामगिरी बजावली आहे. माणसाच्या राहणीमानात आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. चारचाकी वाहनांची संख्या वाढली, मोठ्या प्रमाणावर लोकं विमानाने प्रवास करू लागले, इंटरनेट तसेच इलेक्ट्रॉनिक क्रांती बघण्याच मोठं सौभाग्य आपल्याला लाभला… परंतु हे सगळं घडत असतांना जर तुम्हाला कोणी सांगितलं कि महाराष्ट्रात डोमेस्टिक व्हायलेन्स रेट वाढत चाललाय तर तुम्ही देखील हा विचार करणार कि लोकांच्या राहणीमानात उत्कृष्ट क्रांतिकारी बदल होत असतांना स्त्रियांना मात्र रूढीवादी परिस्थितीत कोंडून ठेवलं जात आहे.
आज आम्ही तुम्हाला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा अहवाल फक्त वाचून नाही दाखवणार आहोत तर महाराष्ट्रात वाढत्या स्त्री अत्याचारामागे मुळात हाथ कुणाचा असू शकतो, या विषयाचा शोध घेणार आहोत. थोडक्यात असे समझा कि स्त्री अत्याचारामागे जेवढा दोषी पुरुष आहे, तेवढी स्वतः स्त्री सुद्धा आहे.
डोमेस्टिक व्हायलेन्सचे कारणे सांगण्या अगोदर भारत सरकार कडून काही रिपोर्ट्स आली आहेत, त्यावर एकदा नजर फिरवूयात.
‘नॅशनल कमिशन फॉर वूमन’ नुसार स्त्री स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीये, २०२२ च्या अहवालानुसार वेगवेगळ्या अत्याचारांना मिळून एकूण ३०८६५ केसेस वर्षभरात रजिस्टर झाले होते. चिंतेची बाब ही आहे कि पूर्ण भारतात उत्तरप्रदेश आणि दिल्ली नंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर येतो. GDP मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहेच, पण ही प्रगती काय कामाची जर महाराष्ट्रात राहणाऱ्या स्त्रियांना वंचित करून ठेवले जातय. नॅशनल कमिशन फॉर वूमन’ नुसार जर स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर ही संख्या झपाट्याने कमी होईल. परंतु एका बाजूने सरकार स्त्रियांना जागरूक करत आहे तर दुसऱ्या बाजूने टीव्ही मुळे त्याच स्त्रिया मागासलेल्या बनत आहेत, तर मग सरकारचे प्रयत्न विफल नाही जात आहेत का ? मुळात आम्ही टीव्ही चा मुद्दा का उचलला ? ह्या विषयवर येण्या अगोदर ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’ काय बोलत आहे, हे जाणून घेऊयात.
‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’ नुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षात घरगुती हिंसेत वाढ झालेली आहे. गेल्या पाच वर्षात राजस्थान सारख्या पुरुषप्रधान राज्यात आणि तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पच्छिम बंगाल सारख्या राज्यात घरगुती हिंसेची आकडेवारी कमी झाली. परंतु औद्योगिकीकीरणात पहिल्या स्थानात असलेल्या महाराष्ट्रात मात्र हीच संख्या वाढली आहे. २०१५ मध्ये १८ ते ४९ वर्षीय महिलांमध्ये घरगुती हिंसेची टक्केवारी २१.३ टक्के होती, तर २०२० मध्ये हीच संख्या २५ टक्क्यांवर जाऊन पाहोचली. चिंताजनक गोष्ट ही पण आहे कि देशभरात हीच संख्या ३१.२ वरून २९.३ वर आलेली आहे. पण महाराष्ट्रात असे काय घडतय कि त्याचा प्रभाव स्त्रियांवर दिसून येतो ?
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे कि स्त्रीला स्वतः वाटतं कि मार खाणं हा तीच कर्तव्य आहे तर मारणे पुरुषांचा अधिकार आहे. एखाद्या स्त्रीचे असले दुय्यमदर्जाचे विचार बघून त्यांच्यातला शिक्षणाचा अभाव समझून येतो. अहवालानुसार पत्नीला मारणे ही अगदी सामान्य बाब आहे. भारतामध्ये जेव्हा सर्वे करण्यात आला तेव्हा असे जाणून आले कि जर पत्नी ने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर ती शारीरिक अत्याचारास पात्र ठरते असे स्वतः नागरिकांना वाटत आहे. सुमारे 11 टक्के महिला आणि 9.7 टक्के पुरुषांना असे वाटते की लैंगिक संबंधास नकार दिल्याने पत्नीला मारहाण केली पाहिजे. अर्थातच ही आकडेवारी लोकांमध्ये असलेलं मानसिक अपंगत्व दर्शवतय. ह्या सगळ्या सर्वेवरून एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे अशिक्षित स्त्रियांवर ५वी पर्यंत शिकलेल्या स्त्रियांपेक्षा जास्त मारहाण होते. २०१० मध्ये डिस्कवरी चॅनेल ने राजस्थान मध्ये एक सर्वे केला होता. त्यात काही स्त्रियांनी स्वतः कबूल केले होते कि मार खाणं स्त्रीचं हक्क आहे तर मारणं पुरुषाचं अधिकार आहे. सगळ्या गोष्टींना बघून हाच निष्कर्ष निघतो कि समाजामध्ये स्त्रियांना स्वतःचे हक्कसुद्धा माहिती नाहीयेत.
ही झाली समस्या, आता आपण कारणे आणि त्यांवरील उपायांवर चर्चा करूयात.
तुम्हालातर माहितीच असेल कि पेटीतला एक आंबा बाकी आंब्यांना खराब करतो. तसेच समाजामध्ये होत आहे. पतीकडून मार खाल्यावर ती स्त्री ही गोष्ट अगोदर आपल्या मैत्रिणीला सांगते. ती मैत्रीण तिला पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचा सल्ला देण्याचं सोडून सहन करायला सांगते. आम्हाला माहिती आहे कि सगळीकडे परिस्थिती एकसारखी नसते, परंतु जास्तीसजास्त वेळेस एक मैत्रीण आपल्या पीडित मैत्रिणीला हेच समजवते कि कधी ना कधी नवरा सुधारतो. असल्या दुय्यम दर्जेच्या सल्ल्यामुळे पीडित स्त्री फक्त ह्या आशेने वर्षानुवर्षे सहन करते कि एक दिवस तिचा नवरा सुधरेल. पण ती पीडित व्यक्ती हे सुद्धा विसरून जाते कि अन्याय सहन करणं हे चूक आहे. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे टीव्हीच्या माध्यमातूनसुद्धा हीच गोष्ट मेंदूत भरवली जाते. गेल्या १० वर्षात मराठी मालिकांचे विषय एकाच गोष्टीवर अडकून पडले आहे, ते म्हणजे बाई ल जास्तीतजास्त सहनशील दाखवायचे आणि TRP वाढवायचा. मराठी चॅनेल वरची कोणती ही एक मालिका उचलून बघा, तुम्हाला फक्त एकच विषय दिसेल. प्रोड्युसर्स लोकांना फक्त पैसा दिसतो, पण ते हा विचार करत नाही कि त्यांच्या मालिकांमुळे स्त्रियांची मानसिकता किती बदलतीये. चॅनेल वाल्यांकडे कंप्लेंट गेल्यावर ते देखील बोलतात कि कोणत्या ऐतिहासिक विषयावर मालिका चालवल्यावर TRP खाली पडतो म्हणून तसली दुय्यम दर्जाची मालिका दाखवण्यात येते. गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवर ‘जय शिवाजी जय भवानी’ ही मालिका प्रसारित होत होती, परंतु प्रेक्षकांच्या दुर्लक्षतेमुळे चॅनेलला ही मालिका मधेच थांबवावी लागली. manipulated मालिकांमधून चुकीच्या गोष्टी सहन कारण्यापलिकडे काय शिकायला मिळत असेल हे बनवणार्यांनाच माहिती असेल.
घरगुती हिंसा करणाऱ्या पुरुषांना तेव्हाच चाप बसेल जेव्हा स्त्री उत्तर द्यायला शिकेल. पण समाजातले काही किडे मकोडे अप्रत्यक्षरीत्या घरगुती हिंसेला आधार देत आहेत. त्या मध्ये सहनशीलते चा गुरुमंत्र देणारे मित्र मैत्रिणी किंवा स्वतःच्या घरचे लोकं तेवढेच दोषी आहेत. मनाविरूद्ध जाऊन अपराधी व्यक्तीशी मुलीचे लग्न लावून देणारे आई वडील देखील दोषाचे पात्र ठरतात . तसेच ‘मुलीचे लग्न केव्हा करणार हे विचारणारे अक्कलशून्य शेजारपाजारचे लोकं आणि बिनकामाचे नातेवाईक खऱ्या अर्थाने पीडित स्त्री चे अपराधी असतात… कधी कधी असं होतं कि फक्त नातेवाईक किंवा शेजारच्यांच्या वारंवार विचारण्यामुळे आईवडील मुलाची नीट माहिती करून न घेता मुलीचं लग्न लावून देतात.
हितोपदेश देणारे, सल्ले वाटणारे, विचारपूस करणारे आणि अक्कल गहाण ठेऊन लग्न लावणारे आईवडील- हि सगळी मंडळी बाजूला होऊन जातात आणि शेवटी ती एकटी मुलगी आयुष्यभर मारहाण, अपमान, सहन करत राहते… जेव्हा स्त्री ला कळेल कि सहनशीलतेची कोणतीही मर्यादा नसते तेव्हाच घरगुती हिंसा आटोक्यात येईल.